Author : SandeepKumar Jadhav
५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन हा देशभर साजरा केला जातो. तसेच प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी एका दिवसासाठी शिक्षकाची भूमिका करत असतात. त्यावेळी त्यांना जाणीव होते कि, शिक्षकांचे कष्ट किती, कोणासाठी , कशासाठी आणि कुटपर्यंत ? परंतु मनात असा प्रश्न निर्माण होतो कि, खरच त्यांना हि जाणीव होते का? वास्तवाचा जर आज विचार केला तर आज विद्यार्थामध्ये , शिक्षकांमध्ये एक मोठी तफावत आहे .तसेच ती तफावत का झाली. याचा जर विचार केला तर काही ठिकाणी विद्यार्थी जबाबदार आहे. काही ठिकाणी शिक्षक स्वत जबाबदार आहेत, तर समाज हि जबाबदार आहे .जे स्थान पूर्वीं गुरुणा होते ते आज आपल्याला समाजामध्ये दिसत नाही कारण असे गुरु असणे हि गरजेचे आहे परंतु गुरु मानणे हेही तितकेच महत्वाचे आहे.आपल्याला वर्गात शिकवणारे शिक्षक हेच फक्त गुरु असतात हि संकल्पनाही चुकीची आहे. काही गुरु हे अप्रत्यक्षही असतात. ते मानावे लागतात . याचा अर्थ असा कि , जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीला आपला गुरु मानत नाही तोपर्यंत त्यांच्यावर असलेले आपले प्रेम निश्चितच सार्थक होणार नाही. बर्याच वेळा वर्गामध्ये शिक्षक असताना विद्यार्थाना वाटते हे शिक्षक खूपच दृष्ट आहेत. सारखेच विद्यार्थाना मारत असतात, शिक्षा देत असतात , रागवत असतात. परंतु या सर्वांच्या मागे त्या शिक्षकाचा काही असा उद्देश नसतो, तर तो विद्यार्थी घडावा. त्या विद्यार्थाची प्रगती व्हावी. त्याच्या जीवनाला शिस्त लागावी हि त्या शिक्षेमागची तळमळ असते .कारण, शिक्षक हा विद्यार्थाचा शिल्पकार असतो . ते शिल्प कसे घडेल, चांगले दिसेल, मजबूत टिकेल याची काळजी त्यांना असते. त्यामुळे थोड्या काळासाठी का होईणा ते विध्यार्थाचे वैरी होतात हा एक त्यांचा राग म्हनला तरी चालेल. आज ज्यावेळी आम्ही शाळेमध्ये शिकवायला उभे राहतो त्यावेळी आम्हाला कळते खरच ते शिक्षक आपल्याला शिक्षा करायचे ह्यामागे त्यांचे काय उद्दिष्ट होते. या शिक्षकी सेवेस शतशः प्रणाम !