Kalubainagar Malthan, Tal. Phaltan, Dist. Satara 415523
sandeepkumar_jadhav@hotmail.com +91 9960002233

ABOUT

About US

सर्वसामान्य अशा सैनिक परीवारात जन्मलेले एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे संदीपकुमार कैलास जाधव. वडील भारतीय सैन्य दलात असल्यामुळे संदीपजिंचेप्राथमिक शिक्षण सैनिक शाळेमध्ये झाले आणि शिस्तीचे धडे त्यांना आपल्या कुटुंबातून आणि शाळेतून अगदी बालवयात मिळाले.सैनिक शाळेतील शिक्षणामुळे शिस्त, कलात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोन ,नाविन्यता दृढ अपार संघटन कौशल्य, सक्षम तसेच कणखर नेतृत्व सहकार्याची भावना स्पष्ट वक्तेपणा आणि हजर जबाबदारीपणा प्रचंड धेयुवृती जिद्द अशा गुणांनी जणू ईश्वराने त्यांना परिपूर्ण केलेले एक हसतमुख दीलसूलासव दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे संदीपकुमार जाधव.

एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्यामुळे अगदी विद्यार्थी दशेपासून त्यांनी विद्यार्थी चळवळीतसक्रीय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी टोक्याचा संघर्ष केला. आणि त्यातूनच पुढे जाऊन एका युवा नेतृत्वाचा जन्म झाला. कलेचे वरदान ईश्वराकडून अगोदरच लाभलेले त्यामुळे एक अप्रतिम व सर्वउत्कृष्ट चित्रकार म्हणून फार कमी वेळातहे व्यक्तित्व कला रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले. मात्र ईश्वराने अगदी तापून सालोखूनपाठवलेले हे व्यक्तित्व इतक्यावरच कसे थांबणार.

विद्यार्थी दशेतील चळवळ त्यांना स्वस्थ बसू स्वरूपदेईना म्हणून पुढे जाऊन फक्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे देशातील पहिले एकमेव असे “स्टुडंट मिरर” वृत्तपत्र त्यांनी चालू केले. वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक चर्चासत्र आयोजित करून युवकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला मात्र हे सर्व होत असताना मनातून एक कलावंत सारखा आवाज देत होता की कलावंतांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या समस्यांसाठी त्यांच्या हक्काचे एक व्यासपीठ असले पाहिजे आणि यातून पुढे “कलारंग कलामोह्त्सव” या संस्थेचा जन्म झाला. तसेच युवकांना रोजगार निर्मिती व्हावी याकरिता “कलारत्न उद्योग समूहाची” स्थापना केली व तीचा विस्तार करण्याकरिता सतत पर्यंतशील असतात.

मा.संदीपकुमार कैलास जाधव

पत्ता

“ गुरुकृपा ” काळूबाई मंदिर शेजारी, काळूबाई नगर,

मलठण, ता. फलटण,

जि. सातारा. पिन कोड : ४१५५२३

जन्म १३/०७/१९९१

जन्मस्थळ : आर्मी हॉस्पिटल मथुरा , उत्तरप्रदेश

शिक्षण

१ ते ३ सैनिक शाळा

४ ते १० श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल फलटण.

११ ते १२ मुधोजी महाविद्यालय फलटण.

ATD भारतीय कला महाविद्यालय जंग्शण ता. इंदापूर जि. पुणे .

ENTER PRINTING भारतीय विद्यापीठ भारती कला महाविद्यालय कात्रज पुणे.

EGD ART - ART MASTER कलासागर कला महाविद्यालय पुणे.

संस्थात्मक कार्य

संस्थापक : कलारत्न बिझनेस ग्रुप २०११ .

संस्थापक : कलारत्न सर्वसाधारण सह. संस्था मर्या. फलटण ता. फलटण जि. सातारा २०१८ ते आजअखेर.

संस्थापक : कलारत्न आर्ट इन्स्टिट्यूट अॅण्ड चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर २०१३ ते आजअखेर.

संस्थापक : कलारत्न स्टुडीओ २०१२ ते आजअखेर.

संस्थापक : कलारंग कला मोह्त्सव २०१८ ते आजअखेर.

संस्थापक : कलारत्न सहकारी मुद्रणालय २०१९ ते आजअखेर.

संस्थापक : विधीशास्त्र लॉ बुक्स अँड स्टेशनरी २०२३

संस्थापक / संपादक : स्टुडन्टस़ मिरर २०१२

संस्थापक / अध्यक्ष : विद्यार्थी, कलामंच सन २००७ ते २०१२.

संस्थापक / अध्यक्ष : विद्यार्थी पॅथर २०११ ते २०१५.

संयोजक : संस्कार भारती, फलटण शाखा. २०१4 ते २०१६.

संघटनात्मक कार्य

मंत्रालयीन जनसंपर्क अधिकारी तथा प्रवक्ता : केंद्रीय पत्रकार संघ, ( Central Press Journalist Association ) २०२१ ते आजअखेर .

राज्य संघटक : ग्राहक हित समिती , महाराष्ट्र २०२२ ते आजअखेर.

अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य कला शिक्षणोतरी व बेरोजगार महाराष्ट्र महासंघ २०१२ ते आजअखेर.

अध्यक्ष : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा फलटण शहर २०१६ ते आजअखेर.

ब्युरोचीप : एस. न्युज मराठी वृत्तवाहिनी. २०१९ ते आजअखेर.

उप संपादक : दैनिक वसंतसागर २०२२ आजअखेर.

पुरस्कार व सन्मान

सकल संत सांप्रदायिक व आध्यात्मिक आणि सामाजिक सेवा संस्था (वारकरी संघटना फलटण ) चे समाजभूषण जीवन गौरव सन्मान २०२२

सिटीजन जस्तिज प्रेस कॅन्सील ऑफ महाराष्ट्र, “ राज्यस्थरीय गौरव पुरस्कार ” २०१६

महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ महामंडळ, पुणे, राज्य स्तरीय “ संस्कार चित्रकला स्पर्धा “ गौरव, प्रथम क्रमांक सन २००५ - २००६

तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण फलटण,” सर्वोत्तम स्वयंसेवक “ संयोजक : कोविड-१९ समुपदेशन फलटण २०२०

ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया " कोरोना वॉरियर " २०२० – २१ .

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई व साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन, फलटण यांच्या संयुक्त विद्यमानाने “ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा “ कथा लेखन कार्यशाळा २०२२ .

दैनिक, तुफान क्रांती “ आदर्श सेवा सन्मान पुरस्कार ” २०२१

कलासागर कला महाविद्यालय पुणे राज्यस्थरीय कला स्पर्धा( इलीप्स ) २०१२

कलासागर कला महाविद्यालय पुणे राज्यस्थरीय कला स्पर्धा( इलीप्स ) २०११

भारतीय कला महाविद्यालय अन्थुरणे त. इंदापूर जि. पुणे. स्वागत उत्सव २०११.

भारतीय कला महाविद्यालय व आर्ट टुडे गलरी पुणे, ( serigraphy print workshop ) २०११ .

महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा फलटण. आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन २०११

श्रीरामदासस्वामी संस्था, सज्जनगड सातारा. “ उत्कृष्ट कार्यकर्ता ” २००७ -२००८

ग्रामपंचायत निंबळक व महात्मा फुले मंच आयोजित “ विशेष श्रम संस्कार शिबीर ” २००८ - २००९

जिल्हा परिषद “ युवा स्वच्छता दूत ” राष्ट्रीय सेवा योजना २००८.

ग्रामपंचायत दुधेबावी “ विशेष युवा स्वच्छता शिबीर ” २००८.

ग्रामपंचायत “ विशेष श्रम संस्कार व युवा स्वच्छता शिबीर ” २००८.

प्रतापगड उत्सव समीती फलटण आयोजित किल्लेस्पर्धा २००६.

मनोबल बालविकास प्रतिष्ठान २००४-२००५.

अखिल भारतीय नागरी विकास केंद्र औरंगाबाद २००२.

महाराष्ट्र छात्र सेना २००६ - २००७.

kibbtos डिसेंबर २००५.

हेल्पेज इंडिया जुलै २००२.